स्पर्धापारीक्षामधील करीअर

         सध्याचा युग हे स्पर्धापरीक्षांच आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अविरत कष्ट आणि अत्माविश्वसासोबातच गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची.

        महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनातील अधिकारी निवडण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेचे तीन टप्पे आहेत, सर्वप्रथम पूर्वपरीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत. ही परीक्षा देण्यासाठी आयोगाने पात्रतेचे काही निकष दिलेले आहेत,

१) खुल्या संवर्गासाठी वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.

२) तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादा ३८, तर अनुसूचित जाती व जमाती यांना ४३ ही वयोमर्यादा आहे.

३) उमेदवाराकडे शासनमान्य विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

४) पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थीसुद्धा पूर्वपरीक्षा देण्यासाठी पात्र असतात. पण मुख्य परीक्षेच्या वेळी इतर कागदपत्रे जोडताना पदवी प्रमानापत्रावरची तारीख महत्वाची असते.

५) आयोगाने दिलेल्या वयोमर्यादेत उमेदवार कितीही वेळा परीक्षा देऊ शकतो.

        mpsc तून ज्या पदांसाठी अधिकारी निवडले जातात त्या पदांची यादी खालीलप्रमाणे आहे-

‘अ’ वर्ग अधिकारी पदे

१) उपजिल्हाधिकारी

२) सहाय्यक पोलीस आयुक्त /पोलीस उपाधीक्षक

३) सहाय्यक विक्रीकर आयुक्त

४) उप-निबंधक सहकारी संस्था

५) उप-मुख्य कार्यकारी अधिकारी

६) अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

७) गटविकास अधिकारी –वर्ग अ

८) महाराष्ट्र वित्त व लेख सेवा-गट अ

९) मुख्य अधिकारी , नगरपालिका/नगरपरिषद-वर्ग अ

१०) तहसीलदार

‘ब’ वर्ग अधिकारी पदे-

१) गटविकास अधिकारी-वर्ग ब

२) मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद वर्ग-ब

३) मंत्रालय कक्ष अधिकारी

४) उप-निबंधक सहकारी संस्था-वर्ग ब

५) उपाधीक्षक, भूमी अभिलेख

६) उपाधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

७) महाराष्ट्र वित्त व लोकसेवा गट-ब

८) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी

९) नायब-तहसीलदार

           याव्यतिरिक्त

१) पोलीस उपनिरीक्षक

२) विक्रीकर निरीक्षक

३) सहाय्यक

४) कर सहाय्यक

            या अराजपत्रित पदासाठीदेखील आयोगामार्फत दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात.

वरील सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम तसेच दरवर्षीच्या जाहिराती,परीक्षांचे वेळापत्रक, निकाल आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जातो.

        करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षणं प्राधान्य देण्याची मानसिकता आता पालकामध्ये आणि विध्यार्थ्यामध्ये वाढली आहे ही समाधानाची बाब आहे. पण स्पर्धा परीक्षाकडे केवळ शासकीय नोकरी,सरकारी बंगला, लाल दिव्याची गाडी, सामाजिक प्रतिष्ठा या दृष्टीकोनातून पाहून चालणार नाही तर आपल्याला नेमके काय सध्या करायचे आहे याविषयी स्पष्टता असणे गरजेचे आहे. ते सध्या करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची गरज आहे. एक आणि एकाच परीक्षेत अडकून पडल्यास उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. म्हणून केंद्र तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची माहिती घेऊन उमेदवाराने आपली योजना आखणे महत्वाचे आहे.